¶ प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
TSK
TSK · इब्री 11:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत? तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो. त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही.
पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.
लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे.
परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
“हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”