आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन मिद्यांन्यापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता.
TSK
TSK · इब्री 11:32
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.
परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.
मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
¶ शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
¶ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.
‹तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.›
¶ आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.
हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले.
¶ पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)
¶ तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय?
बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या.
कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.