¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
TSK
TSK · इब्री 11:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.”
ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही.
पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”
जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?
‹आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.›
¶ ‹जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे.›
‹तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.›
‹परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ›
‹त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील.›
‹म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”›
मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
¶ बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.
म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”