TSK

TSK · इब्री 6:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुझे मरण पावलेले जिवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा. कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.”

अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.

तो तिला म्हणाला, ‹“तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?”› ते म्हणाले, होय, “पिता येईल!”

¶ ‹मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल.›

बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात.

‹जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.›

परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परूश्याला फार आश्चर्य वाटले.

‹म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”›

¶ मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.

‹आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.›

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.

परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या.

मग पेत्र म्हणाला, “या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”

मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.

तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला, कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो” कारण येशू व पुनरुत्थान ह्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.

पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.”

आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.

तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”

पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.

किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?

मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला.

जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही,

ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.

कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.

हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.

नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले.

¶ आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की, “बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.