येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
TSK
TSK · होशे 2:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,
मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेन, त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”
हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.”
मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”
म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.