TSK

TSK · होशे 4:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.

मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील.

तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील.

धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.

म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.

तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.

खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.

¶ पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.