TSK

TSK · होशे 5:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.

त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.

पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.

यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे.

मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन.

हायहाय, त्यांना! कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे. मी त्यांची सुटका केली असती; पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.

यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.