शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने या दैवतांची गत करून टाकली.
TSK
TSK · होशे 8:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरूशलेमेमध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या. या परकीय दैवतांची पूजा होत असे. अशेराच्या मुर्तीही त्यांनी उखडून टाकल्या. यहूदा आणि बन्यामीन प्रांतातील सर्व उंचस्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. इतर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. व तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.
त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे.
ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.
राष्ट्रांत घोषणा कर व ऐकू येईल असे सांगा! निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका. म्हणा, बाबेल घेतली आहे. बेल लज्जित झाला आहे. मरदोख मोडला आहे. त्यांच्या मूर्तींची फजीती झाली आहे. त्यांचे पुतळे मोडले आहेत.
शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
मूर्तीकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे, कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो.
पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.