तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील.
TSK
TSK · होशे 8:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.
जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले, परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.
त्यांनी गहू पेरला पण काटेरी झाडांची कापणी केली, त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही. परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील.”
परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे; पण त्यास हे ठाऊक नाही. त्याचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहित नाही.
तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
¶ फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल.