TSK

TSK · होशे 9:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.

¶ जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;

तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वरास आनंद वाटत होता तसाच आनंद त्यास तुमचा नाश करायला आणि तुम्हास रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हास हुसकावून लावले जाईल.

तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे, तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील.

होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले.

पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.

यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”

एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.

मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील.

ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?

ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते, ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.