TSK

TSK · यश 1:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.

देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?

तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”

परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल.

तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.

तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन; आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.

त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.

¶ या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये.