TSK

TSK · यश 1:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील, आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल.

परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.

हे घडेल का? लोकांस असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहूबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही.

पुष्कळ जलांनी त्यास उंच वाढवले. खोल जलांनी त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्यांचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते.