कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
TSK
TSK · यश 13:20
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील. तिच्यात कोणीएक मनुष्य किंवा पशूही राहणार नाही. ते दूर पळून जातील
परमेश्वर असे म्हणतो, मराथाईम देशाविरूद्ध उठ, त्याच्याविरुध्द आणि पकोडच्या रहिवाश्यांवर चढाई कर. त्यांच्यावर तलवार ठेवून आणि त्यांचा संपूर्ण नाश करा. मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकगोष्ट कर.
तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती, खास्द्यांच्या देशाविरूद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका; ते खचित कळपातील लहानांनादेखील, ओढून नेतील, त्यांचे कुरणाचे देश नाशाची जागा होईल.
भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.
तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही
¶ मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही.