मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.
TSK
TSK · यश 19:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.
नंतर अहज्या आपल्या शोमरोनमधल्या त्याच्या माडीवरच्या खिडकीच्या जाळीतून खाली पडला व जखमी झाला. तेव्हा अहज्याने आपल्या सेवकांना बोलावले आणि त्यांना सांगितले. “जा, आणि एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारून या, मी या दुखण्यातून बरा होईन का.”
अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो.
ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
¶ ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत. फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत. तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे?
ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला; कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील.
तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर असे परमेश्वर देव जाहीर करतो व ते मी करेनच.
म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील.
कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”