TSK

TSK · यश 22:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.”

शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.

मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.

म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.

खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.

¶ पुन्हा तो त्यांना म्हणाला, ‹“मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.”›

जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.”