TSK

TSK · यश 28:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.

¶ हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.

यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने खास्दी, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे घडेल म्हणून सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडत होते. यहूदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.

तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.

पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत.

¶ ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.

“यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’

तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहूदाच्या राजांनो आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा! मी या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिणझिणतील.

¶ या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.

मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.