TSK

TSK · यश 29:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.

तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.

ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा युद्धाचा झेंडा बघून घाबरतील ज्याचा अग्नी सियोनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरूशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे.

¶ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा.

वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.

मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील.

“बेथेलला जा आणि पाप करा, गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा, तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.

¶ अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.