त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये, आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”
TSK
TSK · यश 29:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे. त्याने तुमचे डोळे बंद केले आहेत, जे भविष्यवादी आहेत आणि परमेश्वर तुमची डोकी झाकले, जे तुम्ही दृष्टांत पाहता.
“मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत:च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”
पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही,
“आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.
संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनांमुळे, माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. ज्यावर द्राक्षरस हावी झाले आहे,
बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे. राष्ट्रे तिचा द्राक्षरस प्याली आणि ते विवेकशून्य झाले.
“इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा! कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.
¶ तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे.›
आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.