दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
TSK
TSK · यश 30:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय, तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का?
घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे; आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही. जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल; दोघांचा नाश होईल.
मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.
चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत:चा जीव वाचवता येणार नाही.
लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.