TSK

TSK · यश 32:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने पाठवलेल्या शत्रूसमोर तुम्हास नतमस्तक व्हावे लागेल. आणि तुम्ही त्यांची सेवा तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे होऊन कराल. परमेश्वर तुमच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवील. ते तुम्हास बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हास वागवावे लागेल.

जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.

ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत

यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका.

बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.

माझ्या लोकांच्या कन्ये, शोकवस्त्रे घाल आणि राखेत लोळ, एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत कर. कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल.

जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.

या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.

जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात.