TSK

TSK · यश 32:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.

जे भ्रांत आत्म्याचे ते बुद्धी पावतील आणि जे तक्रार करतात ते विद्या प्राप्त करतील.”

येशू म्हणाला, ‹“शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.›

तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

¶ मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली.

त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’