सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
TSK
TSK · यश 35:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.”
काही काळाच्या आत लबानोन सुपीक भूमीमध्ये बदलण्यात येईल आणि सुपीक भूमी घनदाट जंगल होईल.
घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
होय, परमेश्वर सियोनेचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. तो त्याचे रान एदेनाच्या बागेसारखे आणि त्याचे वाळवंट तो यार्देन नदीच्या जवळ, परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे. आनंद व हर्ष, आभारप्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील.
कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल; तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.