TSK

TSK · यश 40:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”

परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.

‹कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.›

‹स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.›

लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर ‹“मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे”› असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?

¶ परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.