TSK

TSK · यश 45:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.

तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.

आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.

प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. कारण आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”

परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.

परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.

पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.

त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.

ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते,

ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन,

देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे.

¶ ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?

मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.

परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.

¶ जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.

परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.

¶ परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?”

पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळले आहे काय?

¶ मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, ‹“कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.›

तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.