जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
TSK
TSK · यश 45:25
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.
मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”
ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत.
मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.
आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.
म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.
आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
¶ पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.
¶ पवित्र शास्त्र सांगते, “पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.”
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.