¶ आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
TSK
TSK · यश 48:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही, अशी ते बढाई मारतील.
हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन.
मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही.
परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”
माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.
परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे.
मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, मी हे माझ्या नामास्तव केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्राएलाच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतो.
‹यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.›