तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस;
TSK
TSK · यश 5:23
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.
ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी, वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो,
हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.
पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे. ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
फसवणाऱ्याच्या पद्धती वाईट असतात. तो दुष्ट योजना आखून गरीब योग्य ते बोलतो तेव्हाही तो असत्याने गरीबाचा नाश करू पाहतो.
त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.
लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.”