TSK

TSK · यश 57:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.

हिज्कीया मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दाविदाच्या वंशजांच्या कबरीपाशी उंच भागावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरूशलेममधील लोकांनी त्यास सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे गादीवर आला.

तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु:ख झाले.

म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.

तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस? तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस. मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.