TSK

TSK · यश 62:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

(ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.

यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.

¶ नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत:करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन.

परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.