TSK

TSK · यश 65:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.

खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.

“तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”

तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील. आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल.

तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.”

‹तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे.›