TSK

TSK · यश 65:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;

तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील परमेश्वर देव हे बोलला आहे हे तो करीलच.

परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.

परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.

यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.

मग ते येतील आणि सियोनेच्या शिखरावर आनंदाने गातील. परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षरसासाठी, तेलासाठी, आणि थवा व कळपांची संततीसाठी आनंदित होऊन येतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखीत होणार नाहीत.

“किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.

परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.

‹आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो.›

तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”