आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
TSK
TSK · यिर्म 11:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
यरूशलेमजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर इस्राएलाचा राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती. सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टारोथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगळ देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली.
तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे; ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात.
ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.
आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.
“यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.
यहूदाच्या राजाने बाल दैवतासाठी उच्चासने बांधली त्यामध्ये ते आपल्या मुलांना अग्नीत होमार्पण जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण. आणि असे कधीही माझ्या मनातही आले नाही.
पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.