तू स्वत:ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.
TSK
TSK · यिर्म 13:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप.
आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.
ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
यरूशलेम, यहूदा शहर आणि तिच्यातील राजे आणि नेते यांना मी तो प्याला दिला, म्हणजे वैराण, विस्मय व वाळवंट, आणि फुत्कार व शाप असे होतील.
आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.
जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण केले नव्हते.
त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस.
पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”