TSK

TSK · यिर्म 16:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.

तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.

तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वरास आनंद वाटत होता तसाच आनंद त्यास तुमचा नाश करायला आणि तुम्हास रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हास हुसकावून लावले जाईल.

पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;

बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.

म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.

त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही. यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.

इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?

तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन. कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल.

मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.”