TSK

TSK · यिर्म 21:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.

मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.

तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”

¶ आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.

परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”

परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”

पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”

¶ नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरूशलेमेची तटबंदी फोडली.

¶ “यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.

त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.

ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”