TSK

TSK · यिर्म 23:39

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!

परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूद्यांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरूशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन. माझे नाव राखणारी जागा असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”

जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.

“मी, मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो, मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे? जे मृत्यू पावणारी आहेत, मनुष्यांचे मुले, गवतासारखा केली गेली आहेत.”

“जेव्हा हे लोक व संदेष्टे किंवा याजक तुला विचारतील की ‘परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तेव्हा तू त्यांना सांग, कोणती घोषणा? कारण मी तुम्हास टाकले आहे, परमेश्वर असे म्हणतो.

¶ ज्या दिवशी त्यांनी हे नगर बांधले त्यादिवसापासून आतापर्यंत ते माझा क्रोध आणि कोप चेतविण्याचे कारण होत आले आहेत. म्हणून ते मी आपल्यापुढून दूर करीन.

कारण मी त्याला, त्याच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर व यहूदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन.

परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.

परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत, दऱ्याखोऱ्यांना, झऱ्यांना सांगत आहे; ऐका! मी तुमच्या विरुध्द तलवार चालवीन, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील.

म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.

म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.

हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.

‹मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.›