पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”
TSK
TSK · यिर्म 27:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ म्हणून जे राष्ट्रे आणि राज्ये बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराची सेवा करणार नाही आणि बाबेलाचा राजा याच्या जोखडाखाली आपली मान देणार नाही, त्यास मी त्याच्या हातून नाहीसे करीपर्यंत, तलवारीने, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करीन. असे परमेश्वर म्हणतो.
यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’