TSK

TSK · यिर्म 30:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.

तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो.

म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.

पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.

गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.

परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.

पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.

यरूशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू, सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?

“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.

तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असाह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?

कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.

¶ माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.