TSK

TSK · यिर्म 39:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.

बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.”

बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले.

परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन. आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”

कारण परमेश्वर असे बोलला आहे, तू आपणाला व आपल्या सर्व जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना भय असा होशील, कारण तुझ्या त्यांना तू आपल्या डोळ्यांसमोर शत्रूंच्या तलवारीने पडताना पाहशील. मी सर्व यहूदाला बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्यांना तलवारीने कापून काढील.

¶ यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.

¶ आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.

¶ नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.