तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
TSK
TSK · यिर्म 49:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.
¶ बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
मवाबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या. खडकाच्या खळग्याच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यांसारखे व्हा.”
परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा. कारण बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने तुमच्याविरुध्द नवीन योजना योजली आहे. पळा! माघारी फिरा!
तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे.
¶ मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्यास तलवारीने ठार मारीन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही.
¶ ‹तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”› (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)