TSK

TSK · ईयो 21:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. “त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.

आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका.

देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?

तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.

ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.

जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता? आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.