¶ पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
TSK
TSK · योए 1:10
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल? त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”
“यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.
म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.
दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा! तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे, धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत, कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे.
¶ पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल.