TSK

TSK · योए 2:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे आणि खोऱ्यातील सर्व प्रदेशाकडे पाहिले. त्याने पाहिले तेव्हा पाहा, त्या अवघ्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर त्या प्रदेशातून वर चढताना त्यास दिसला.

आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा.

(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?

¶ ‹परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, › ‹‘सूर्य अंधकारमय होईल, › ‹चंद्र प्रकाश देणार नाही.’›

¶ ‹सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.›

¶ त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;

आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?”