TSK

TSK · योए 3:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

एक मनुष्य हजारांचा पाठलाग करु शकेल काय? दोघेजण दहा हजारांना सळो की पळे करून सोडू शकतील का? परमेश्वरानेच या जमावला आपल्या शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल.

तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापती होता आणि तो परराष्ट्रीयांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.

शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.”

ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.

¶ मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांस जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता.