¶ मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.
TSK
TSK · योहा 11:53
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.
माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
¶ म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
¶ तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
¶ वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.