TSK

TSK · योहा 13:23

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब मनुष्याच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.

देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

¶ आता मरीया व तिची बहीण मार्था आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता.

तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”

तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्‍या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.”

¶ तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले.

त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.