तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”
TSK
TSK · योहा 13:5
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर रहावे;
¶ परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”
देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.
आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”›
¶ मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, ‹“मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय?›
तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापांतून आम्हास मुक्त केले;