कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.
TSK
TSK · योहा 19:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
¶ मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व त्यावरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्यास मी देतो.
¶ हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.
तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.”
त्यास मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला.
जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले!
घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.”
‹तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो; तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे.›
‹मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”›
यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती.
तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी महायाजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हास काहीच कळत नाही.
तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.
तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
¶ प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.
प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.