TSK

TSK · योहा 19:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.

त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.

पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.

येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही.›

¶ म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

¶ शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: