TSK

TSK · योहा 4:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”

जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते.

¶ तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.

पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.

परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक.

¶ येशू तिला म्हणाला, ‹“जा, तुझ्या पतीला बोलावून आण.”›

आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये.